IIT Mains 2017 results declared

27- सीबीएसईनं आज जेईई मेन 2017 या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जेईईमधल्या प्रवेश परीक्षेत राजस्थानमधील कल्पित वीरवाल हा मुलगा देशातून पहिला आला आहे. कल्पितला जेईई प्रवेश परीक्षेत 360 पैकी 360 असे पूर्ण गुण मिळाले आहेत. वीरवाल हा आता 17 वर्षांचा आहे. वीरवाल याचे वडील उदयपूरमधल्या महाराणा भूपल सरकारी रुग्णालयात कम्पाऊंडरची नोकरी करतात. तसेच आई एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. कल्पितचा भाऊ एम्समधून मेडिकलच्या अभ्यासाचे धडे गिरवतो आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, वीरवालला ही आनंदवार्ता सीबीएसईचे चेअरमन आर. के. चतुर्वेदी यांनी फोनवरून सांगितली आहे. कल्पित हा सर्व कॅटेगरीत टॉपर आहे. कल्पित म्हणाला, टॉपर होणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र या परिस्थितीला मी सामान्यपणे घेतोय. आता मी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी मेहनत घेतोय.

दरम्यान, एमडीएस खासगी शाळेतून कल्पितनं 12वीची परीक्षा दिली आहे. त्याचा निकाल येणं अजून बाकी आहे. स्वतःच्या यशासाठी कल्पितनं रेजोनन्स अ‍ॅडव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, उदयपूरचे शिक्षक आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त वीरवालला क्रिकेट, बॅडमिंटन आणि गाण्याचीही आवड आहे.

करिअरबद्दल विचारले असता तो म्हणाला, अजून काही ठरवलं नाही, मात्र आयआयटी बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. जेईई प्रवेश परीक्षा 2017ही 2 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला जवळपास 10 लाख विद्यार्थी बसले होते. त्यातील 2.20 लाख विद्यार्थ्यांची जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.

 

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑